गाण्याचे शीर्षक: | जोडली रेशमी बंधने |
चित्रपट: | लग्न पाहावे करून |
गायक: | बेला शेंडे |
संगीत दिग्दर्शक: | अजय नाईक |
गीत: | अंबारिश देशपांडे |
जोडली रेशमी बंधने हे गीत लग्न पाहावे करून या चित्रपट मधले असून या गीत चे गायक बेला शेंडे हे आहेत. ह्या गीत ला संगीत अजय नाईक यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द अंबारिश देशपांडे यांनी लिहिले आहेत.
Marathi Lyrics
कधी कुठे कशी निनावी
अनोळखी मने जुळावी
युगायुगांची ही बंधने
नवे नवे अधीर नाते
हवे हवेसे होत जाते
फुलांपरी हळवे कोवळे
मन असे गुंतता, बहरली स्पंदने
बरसल्या अक्षता, बांधली कंकणे
जोडली रेशमी बंधने
जोडली रेशमी बंधने
भावनांचे गोड नाते
स्वप्नांतले झाले खरे
सप्तकाची पाऊले मनी
उमटली जणू जन्मांतरे
सूर नवे छेडता, विरली ही अंतरे
जोडली रेशमी बंधने
जोडली रेशमी बंधने
मोहणारे सात फेरे
स्वप्ने नवी सामावली
अमृताचे स्पर्श कोवळे
वेडी ओढ ही श्वासांतली
क्षण असे वेचता, प्रीत ही रंगली
जोडली रेशमी बंधने
जोडली रेशमी बंधने
जोडली रेशमी बंधने