जीव रंगला – Jeev Rangla Lyrics in Marathi – जोगवा 2009

0
1407
jeev-rangala
गाण्याचे शीर्षक:जीव रंगला
चित्रपट:जोगवा
गायक:हरिहरन, श्रेया घोषाल
संगीत दिग्दर्शक:अजय-अतुल
गीत:संजय कृष्णजी पाटील

जीव रंगला हे गीत जोगवा या चित्रपट मधले असून या गीत चे गायक हरिहरन, श्रेया घोषाल हे आहेत. ह्या गीत ला संगीत अजय-अतुल यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द संजय कृष्णजी पाटील यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू
पैलतीरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझं तू
सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं, पुनवंचा चांद तू

जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू
चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल सारी धरती तुझी, रुजव्याची माती तू
खुळं आभाळ ढगाळ, त्याला रुढींचा इटाळ माझ्या लाख सजणा ही कांकणाची तोड माळ तू
खुळं काळीज हे माझं तुला दिलं मी आंदण
तुझ्या पायावर माखेल माझ्या जन्माचं गोंदण

जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू
पैलतीरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझं तू
सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं, पुनवंचा चांद तू
जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू
श्वास तू…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here