जगण्याची आशा या मनाची भाषा – Jagnyachi Aaasha ya Manachi Bhaasha Lyrics in Marathi – काकन 2015

0
2531
kaakan
गाण्याचे शीर्षक:जगण्याची आशा या मनाची भाषा
चित्रपट:काकन (2019)
गायक:शंकर महादेवन, नेहा राजपाल
संगीत:अजय सिंह

जगण्याची आशा या मनाची भाषा हे गीत काकन या चित्रपट मधले असून या गीत चे गायक शंकर महादेवन, नेहा राजपाल हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक अजय सिंह आहेत.

Marathi Lyrics

जगण्याची आशा या मनाची भाषा
तू न बोलता न ऐकता समजून घे ना
स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग
उरे बाकी काय तुझी साथ संग असताना

आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या
मनाचा पाळणा करू बांधुनी घे जरा झुला
डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा
तुझ्याविना उरे ना अर्थ जीवना
उजळे तुझ्या हसूने कण कण

अन्‌ चंद्र हे हातीचे काकण
भेटीला आणी तू नवी कहाणी माळून श्वासात ये
लाटांची गाणी दे तुझी निशाणी मनात माझ्या उरे
रंगवुनी टाक आयुष्य माझे सूर तुझे साद दे
पहाट ओलेति तुझ्या उशाशी रातीला आवाज दे

येईन आता मी उराशी आशा ही जाण्याची ही वेळ नको
ओढ तुझी माझ्या लागे जीवा रे जीवाशी खेळ नको
तू अशीच ये ना नि मिठीत घे ना
जग धुंद धुंद नको पाश बंध कुठलाच आता
दे हातात हात जरी दूर वाट
भीती नाही आज तुझी संग साथ असताना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here