गोंधळ – Gondhal Lyrics in Marathi – ऑनलाइन बिनलाईन 2015

0
2035
Gondhal
गाण्याचे शीर्षक:गोंधळ
चित्रपट:ऑनलाइन बिनलाईन(2015)
गायक:प्रसेनजित कोसंबी
संगीत:निलेश मोहरीर

Marathi Lyrics

आई जगदंबेचा नावानी उदो उदो
उदो उदो उदो
उदो उदो उदो

दिमडी वाजे मुरली नाचे घुमतो या संबळ
जोगवा मागतो आईचा मांडतो गोंधळ
भंडारा मिरवतो कपाळी आभाळी गुलाल
जोगवा मागतो आईचा मांडतो गोंधळ
आई जगदंबे गोंधळाला ये
आई जगदंबे गोंधळाला ये

महालक्ष्मी आदी शक्ती चंडिका महामाया
कामक्रोध महिशामार्डून ये भक्ता ताराया
मोहमायेचा सागर गहिरा पैलतीरावर ने
आई जगदंबे गोंधळाला ये
आई जगदंबे गोंधळाला ये

कळसा वरती फुले उधळतो पायी ठेऊन माथा
धाव पाव तू हाकेला या आजान बाला करिता
घोर संकेत दुख निवारून पदरा खाली घे
आई जगदंबे गोंधळाला ये
आई जगदंबे गोंधळाला ये

आई जगदंबेचा नावानी उदो उदो
आई जगदंबेचा नावानी उदो उदो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here