कोणते नाते – Konte Naatey Lyrics in Marathi – आम्ही दोघी 2018

0
1912
गाण्याचे शीर्षक:कोणते नाते
चित्रपट:आम्ही दोघी
गायक:वैशाली म्हाडे
संगीत:मंगेश धाकडे
गीत:गुरु ठाकूर

कोणते नाते हे गीत आम्ही दोघी या चित्रपट मधले असून या गीत चे गायक वैशाली म्हाडे हे आहेत. ह्या गीत ला संगीत मंगेश धाकडे यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

वेगळया वाटा निराळे आपले आभाळ हे
का तुझ्या माझ्यात असती बंध कुठले ना कळे
कोण जाणे काय आहे या क्षणाचे मागणे
कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे
का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे

लाख शंका या मनाशी प्रश्न होती भोवरे
का तुझ्या डोळयात माझी शोधते मी उत्तरे
वाटते का हे निराळे मला माझे वागणे
कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे
का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे

वेगळया वाटा निराळे आपले आभाळही
का तुझ्या माझ्यात विणतो बंध हळवे काळही
कोण जाणे काय आहे या क्षणाचे मागणे
कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे
का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे

हा तुझा आहे लळा की सोबतीची आस ही
काय देऊ नेमके या भावनेला नाव मी
या मनाचे त्या मनाशी उगा हे रेंगाळणे
कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे
का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here