किती सांगायचय मला – Kiti Sangayachay Mala Lyrics in Marathi – डबल सीट 2015

0
1462
Kiti-Sangayachay-Mala
गाण्याचे शीर्षक:किती सांगायचय मला
चित्रपट:डबल सीट
गायक:आनंदी जोशी, जसराज जोशी
संगीत दिग्दर्शक:ऋषिकेश, सौरभ, जसराज
गीत:स्पृहा जोशी
संगीत लेबल:व्हिडिओ पॅलेस

किती सांगायचय मला हे गीत डबल सीट या चित्रपट मधले असून या गीत चे गायक आनंदी जोशी, जसराज जोशी हे आहेत. ह्या गीत ला संगीत ऋषिकेश, सौरभ, जसराज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द स्पृहा जोशी यांनी लिहिले आहेत. आणि व्हिडिओ पॅलेस यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

किती सांगायचय मला किती सांगायचय
किती सांगायचय मला किती सांगायचय
कोरडया जगात माझ्या भोवती चार भिंती
बोचरे नकार सारे आशा क्षणात विरती

बेचैन स्वप्नांची अन पाखरे हरून जाती
मनाच्या पाऱ्याला मग आवरू किती
किती सांगायचय मला किती सांगायचय
मना
हवे असे, अलावारसे कोणा कसे सांगायचे हे गाणे
मना,
माझ्या जागी जा रंगुनी पाहून घे हे स्वप्न दिवाणे

हलके हलके सुख हे बरसे
हलके हलके सुख हे बरसे
मनाच्या पाऱ्या ला हे स्वप्नांचे बहर
मनाच्या आभाळी अशी ओले ती लहर

घेऊदे मनाला श्वास मोकळा
किती सांगायचय मला किती सांगायचय
हसऱ्या सुखाचा पहिला वहिला मोहर हा
थकल्या जीवाला पहिल्या सरीचा दरवळ हा
क्षण हे हळवे जपावे , इवल्या ओठी हसावे

आज चिंब व्हावे
पार पैल जावे
किती सांगायचय
मनाच्या पाऱ्या ला हे स्वप्नांचे बहर
मनाच्या आभाळी अशी ओले ती लहर
मनाच्या गावी असे दोघांचेच घर
घेऊदे मनाला श्वास मोकळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here