गाण्याचे शीर्षक: | काही कळे तुला |
चित्रपट: | फुगे |
गायक: | जानवी प्रभु अरोरा आणि स्वप्निल बांदोडकर |
संगीत: | निलेश मोहरीर |
गीत: | मंदार चोलकर |
काही कळे तुला हे गीत फुगे या चित्रपट मधले असून या गीत चे गायक जानवी प्रभु अरोरा आणि स्वप्निल बांदोडकर हे आहेत. ह्या गीत ला संगीत निलेश मोहरीर यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द मंदार चोलकर यांनी लिहिले आहेत.
Marathi Lyrics
नकळत का असे घडते
नजरेला नजर भिडते
अनोळखी वाटेवरती
जीव होतो खुळा
काही कळे तुला
काही कळे मला
चाहूल भेटण्याची
हि ओढ वाहण्याची
या उधाणल्या लाटेवरती
जीव होतो खुळा
तुझ्याकडे रुसायचे
तुझ्या सवे हसायचे
अबोल मी अबोल तू
मनातले कळायचे
स्वप्न सावलीचे
जपून येई पुन्हा पुन्हा
या अनोळखी वाटेवरती
येऊन भेट मला
शहारल्या क्षणात हि
अपूर्ण मी अपूर्ण तू
उन्हातल्या धुक्यातुनी
खुणावतो नवा ऋतू
भास आठवांचे असूनही
पुन्हा पुन्हा
या अनोळखी वाटेवरती
स्पर्श भेटे मला