Home Marathi Songs कांदा पोहे आयुष्य हे चुलीवरल्या – Kande Pohe Ayushya He Chulivarlya Lyrics...

कांदा पोहे आयुष्य हे चुलीवरल्या – Kande Pohe Ayushya He Chulivarlya Lyrics in Marathi – सनई चौघडे 2008

0
2263
kande-pohe
गाण्याचे शीर्षक:कांदा पोहे आयुष्य हे चुलीवरल्या
चित्रपट:सनई चौघडे

कांदा पोहे आयुष्य हे चुलीवरल्या हे गीत सनई चौघडे या चित्रपट मधले आहे.

Marathi Lyrics

https://www.youtube.com/watch?v=o5K0ARwAlwQ

भिजलेल्या क्षणांना आठवणीची फोडणी
हळदीसाठी आसुसलेले हळवे मन अन कांती
आयुष्य हे चुलीवरल्या कडईतले कांदे पोहे…..

नात्यांच्या या बाजारातून विक्रेत्यांची दाटी
आणि म्हणे तो वरचा ठरवी शत जन्माच्या गाठी
रोज नटावे रोज सजावे धरून आशा खोटी
पाने मिठुनी लाजळूपरी पुन्हा उघडण्यासाठी
आयुष्य हे चुलीवरल्या कडईतले कांदे पोहे…..

दूर देशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहताना
कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानी मनी नसताना……..
नकळत आपण हरवून जावे स्वतः मग जपताना
अन मग डोळे उघडावे हे दिवसा स्वप्न पाहताना
आयुष्य हे चुलीवरल्या कडईतले कांदे पोहे……

भूत- कालच्या धुवून अक्षता तांदूळ केले ज्यांनी
आणि सजवला खोटा रुखवत भाड्याच्या भाड्यानी…..
भविष्य आता रंगवण्याचा अट्टाहास हि त्याचा
हातावरल्या मेहंदीवर ओतून लिंबाचे पाणी
आयुष्य हे चुलीवरल्या कडईतले कांदे पोहे…..

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Notifications    OK No thanks