कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी – Kashi Mi Jau Mathurechya Bajari Lyrics in Marathi – नटरंग 2009

0
4902
Kashi-Mi-Jau-Mathurechya-Bajari
गाण्याचे शीर्षक:कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी
चित्रपट:नटरंग
गायक:बेला शेंडे, अजय गोगवळे
संगीत दिग्दर्शक:अजय-अतुल
गीत:गुरु ठाकूर
संगीत लेबल:झी म्युझिक मराठी

कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी हे गीत नटरंग या चित्रपट मधले असून या गीत चे गायक बेला शेंडे, अजय गोगवळे हे आहेत. ह्या गीत ला संगीत अजय-अतुल यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत. आणि झी म्युझिक मराठी यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

दहीदुध लोणी घागर भरुनी नेऊ कशी बाजारी
बावरले मी सावरले ग जाऊ कशी चोरुन बाई
मथुरेच्या बाजारी.. कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी ?

नटखट भारी किस्‍नमुरारी टपला यमुनातीरी
करतोय खोडी घागर फोडी जाऊ कशी चोरून बाई
मथुरेच्या बाजारी.. कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी ?

नकोस फोडु कान्हा माझी घागर आज रिकामी
हसेल सारी गोकुळ नगरी होईल रं बदनामी
आज दिली बघ नंदकिशोरा हाती लाज तुझ्या रे
रितीच घागर नशीबी माझ्या, शरण तुला मी आले
देवा शरण तुला मी आले

वाट अडवून हसतो गाली ग वेणु ऐकुन मोहित झाले
भान हरपून रमती गोपिका, श्यामरंगी न्हाऊन गेले
मन भुलवी असा कान्हा झुलवी असा हा नटनागर गिरीधारी
त्याच्या संग दंगले, रास रंगले, पिरतीची रीत न्यारी
कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here