करूया आता कल्ला कल्ला – Karuya ata kalla Lyrics in Marathi – बालक पालक 2013

0
1287
kalla
गाण्याचे शीर्षक:करूया आता कल्ला कल्ला
चित्रपट:बालक पालक

करूया आता कल्ला कल्ला हे गीत बालक पालक या चित्रपट मधले आहे.

Marathi Lyrics

करुया दंगा करुया पंगा
पुस्तक पाटी खुंटीला टांगा
उठता बसता नसेल आता
अभ्यासाचा सल्ला
धीडकाउनिया साऱ्या चिंता
करूया आता कल्ला कल्ला कल्ला
करूया आता कल्ला कल्ला कल्ला

धमाल फंडे शोधून सारे
या अकलेचे तोडू तारे
हुल्लड बाजी चिल्लर चाळे
पुन्हा नव्याने सुरु करारे
मिळेल संधी जिथे चकटफू
खुशाल मारू गल्ला
करूया आता कल्ला कल्ला कल्ला
करूया आता कल्ला कल्ला कल्ला

प्रश्न शेकडो लाखो शंका
मनात त्याचा वाजे डंका
मोठे करती मुस्कट दाबी
वाढत जातो त्यातून गुंता
जोवर नाही मिळत रे
तोवर लढवू किल्ला किल्ला किल्ला
करूया आता कल्ला कल्ला कल्ला
करूया आता कल्ला कल्ला कल्ला

करू नका हे करू नका ते
हुकुम हजारो सुटतील येथे
उठता बसता जो तो केवळ
उगाच देईल सल्ला
करूया आता कल्ला कल्ला कल्ला
करूया आता कल्ला कल्ला कल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here