कधी तू – Kadhi tu lyrics in Marathi – मुंबई पुणे मुंबई 2010

0
2234
kadhi-tu
गाण्याचे शीर्षक:कधी तू
चित्रपट:मुंबई पुणे मुंबई
गायक:ऋषिकेश रानडे
संगीत दिग्दर्शक:अविनाश विश्वजीत
गीत:सतीश राजवाडे, श्रीरंग गोडबोले

कधी तू हे गीत मुंबई पुणे मुंबई या चित्रपट मधले असून या गीत चे गायक ऋषिकेश रानडे हे आहेत. ह्या गीत ला संगीत अविनाश विश्वजीत यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द सतीश राजवाडे, श्रीरंग गोडबोले यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चमचम करणारी चांदण्यात
कधी तू कोसळत्या धारा, थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात, सळसळत्या लाटा,
भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची ओली रात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चमचम करणारी चांदण्यात

कधी तू अंग अंग मोहरणारी, आसमंत
दरवळणारी, रातराणी वेडया जंगलात
कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यांत
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू कोसळत्या धारा, थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात, सळसळत्या लाटा,
भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची ओली रात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चमचम करणारी चांदण्यात

जरी तू कळले तरी ना कळणारे,
दिसले तरी ना दिसणारे, विरणारे
मृगजळ एक क्षणात
तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यांत
कधी तू रिमझिम झरणारी बरसात

कधी तू कोसळत्या धारा, थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात, सळसळत्या लाटा,
भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची ओली रात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चमचम करणारी चांदण्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here