कंठ आणि आभाळ – kanth aani aabhal Lyrics in Marathi – सरीवर सरी 2005

0
1060
kanth-aani-aabhal
गाण्याचे शीर्षक:कंठ आणि आभाळ
चित्रपट:सरीवर सरी
संगीत दिग्दर्शक:भास्कर चंदवारकर
गीत:गजेन्द्र अहिरे

कंठ आणि आभाळ हे गीत सरीवर सरी या चित्रपट मधले आहे. ह्या गीत ला संगीत भास्कर चंदवारकर यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द गजेन्द्र अहिरे यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

कंठ आणि आभाळ दाटून येती
आणि कोसळती….. सरीवर सरी !

पहिल्या उन्हाची हळद ओली होती
फांदीवर पाने जन्म घेत होती
भवताल त्यांना अजून ठाऊक नव्हता
अशा वेळी आल्या….. सरीवर सरी !
आणि कोसळल्या….. सरीवर सरी !

आता कुठे नुकतेच पंख लांब केले
आता कुठे घरट्यातून फांदीवर आले
आभाळ या पिलांचे खूप लांब आहे
अशा वेळी आल्या….. सरीवर सरी !
आणि कोसळल्या….. सरीवर सरी !

उधाण आहे आकाश पेलताना
उभ्या जन्माचा पाऊस झेलताना
स्वत:चे स्वत:शी लढणे दिनरात आहे
अशा वेळी आल्या….. सरीवर सरी !
आणि कोसळल्या….. सरीवर सरी !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here