ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी – Olya Sanjveli , Unhe Sawalis Bilgavi lyrics in Marathi – प्रेमाची गोष्ट 2013

0
2541
olya-sanjveli
गाण्याचे शीर्षक:ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
चित्रपट:प्रेमाची गोष्ट
गायक:बेला शेंडे, स्वप्निल बांदोडकर
संगीत दिग्दर्शक:अविनाश, विश्वजित
गीत:अश्विनी शेंडे

ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी हे गीत प्रेमाची गोष्ट या चित्रपट मधले असून या गीत चे गायक बेला शेंडे, स्वप्निल बांदोडकर हे आहेत. ह्या गीत ला संगीत अविनाश, विश्वजित यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द अश्विनी शेंडे यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा

कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना

आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके
सुख हे नवे सलगी करे, का सांग ना

सारे जुने दुवे, जळती जसे दिवे
पाण्यावरी जरा सोडून देऊया

माझी ही आर्जवे, पसरून काजवे
जातील या नव्या वाटेवरी तुझ्या

रस्ता नवा शोधू जरा, हातात हात दे
पुसुया जुन्या पाउल खुणा
सोबत तुझी साथ दे

वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे

डोळ्यातल्या सरी विसरून ये घरी
ओळख आता खरी होऊन जाऊ दे

सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here