एक कोल्हा भाऊ भुकेला – Ek Kolha Bahu Bhukela Lyrics in Marathi – इरादा पक्का 2010

0
1642
Ek-Kolha-Bahu-Bhukela
गाण्याचे शीर्षक:एक कोल्हा भाऊ भुकेला
चित्रपट:इरादा पक्का

एक कोल्हा भाऊ भुकेला हे गीत इरादा पक्का या चित्रपट मधले आहे.

Marathi Lyrics

एक कोल्हा भाऊ भुकेला, फार होता कावळा
एक तुकडा परी न त्याला, खावयासी गावला
बापड्याने जंगलाचा भाग सारा धुंडला
भर दुपारी तो बिचारा दीनवाणा हिंडला

शेवटचा थकून गेला सावलीला थांबला
उंच होते झाड त्याला उंच शेंडा कोवळा
बसून वरती खाऊ खाई एक काळा कावळा
चोचीमध्ये मांस धरुनी चाखितो तो मसाला

मारुनिया हाक त्यासी गोड कोल्हा बोलला
एक गाणे गा मजेने, साज तुमचा चांगला
कोकिळेचे आप्त तुम्ही, घरीच त्यांच्या वाढला

मूर्ख वेड्या कावळ्याने रागदारी मांडली
चोचीमधील चीज त्याच्या त्वरित खाली सांडली
धावला कोल्हा सुखाने घास त्याने सेविला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here