आभास हा – Aabhas Ha Lyrics in Marathi – यंदा कर्तव्य आहे 2006

0
2787
aabhas-ha
गाण्याचे शीर्षक:आभास हा
चित्रपट:यंदा कर्तव्य आहे
गायक:राहुल वैद्य आणि वैशाली सामंत
संगीतकार:निलेश मोहरिर
गीत:अश्विनी शेंडे

आभास हा हे गीत यंदा कर्तव्य आहे या चित्रपट मधले असून या गीत चे गायक राहुल वैद्य आणि वैशाली सामंत हे आहेत. ह्या गीत चे संगीतकार निलेश मोहरिर आहेत. तसेच ह्या गीत चे शब्द अश्विनी शेंडे यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का
का हे कसे होते असे ही आस लागे जीवा
कसा सावरू मी आवरू ग मी स्वत:
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला

आभास हा आभास हा
छळतो तुला छळतो मला
क्षणात सारे उधाण वारे, झुळुक होऊन जाती
कधी दूर तूही जवळ वाटे पण काहीच नाही हाती
मी अशीच हासते उगीच लाजते पुन्हा तुला आठवते
मग मिटून डोळे तुला बाहते तुझ्याचसाठी सजते

तू नसताना असल्याचा खेळ हा
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला
आभास हा आभास हा
छळतो तुला छळतो मला

मनात माझ्या हजार शंका, तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहेस तसाच नाहीस आहेस खरा कसा रे
तू इथेच बस न हळूच हस न अशीच हवी मला तू
पण माहीत नाही मलाही अजुनी तशीच आहेस का तू

नवे रंग सारे नवी वाटे ही हवा
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला
आभास हा आभास हा
छळतो तुला छळतो मला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here