आनंदघना – Aanadghana Lyrics in Marathi – आनंदी गोपाळ 2019

0
1394
tu-ahes-na
गाण्याचे शीर्षक:आनंदघना
चित्रपट:आनंदी गोपाळ
गायक:आनंदी जोशी आणि हृषिकेश रानडे
संगीत:हृषिकेश, सौरभ आणि जसराज
गीत:वैभव जोशी
संगीत लेबल:झी म्यूझिक कंपनी

आनंदघना हे गीत आनंदी गोपाळ या चित्रपट मधले असून या गीत चे गायक आनंदी जोशी आणि हृषिकेश रानडे हे आहेत. ह्या गीत ला संगीत हृषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द वैभव जोशी यांनी लिहिले आहेत. आणि झी म्यूझिक कंपनी यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

मम पाऊली
तव चाहुली
प्राणास ये
सय कान्हुली

ये जागवी संवेदना
दे पूर्तता या जीवना
आनंदघना

मम पाऊली
तव चाहुली
प्राणास ये
सय कान्हुली

आनंद मन
येई भरा
रे नंदना
मनमोहना
आनंदघना

तुझिया नयनांनी प्रिये
मी माझे स्वप्न हे पहिले
तू माझे मी पण जणू
आपुल्या हातानी रेखिले
तुझियामुळे मी पूर्तता
तुझवाचुनी मी आर्तता
माझ्यासवे आहेस तू
मजला पुरे हि सार्थता

तुझ्यासवे तुझ्यामुळे
तव रंग येऊ लागला
आज माझ्या ह्या मना

मम पाऊली
तव चाहुली
प्राणास ये
सय कान्हुली

आनंद मन येई भरा
आनंद मन येई भरा
रे नंदना मनमोहना
आनंदघना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here