असेच हे कसेबसे – Asech he Kasebase Song Lyrics in Marathi – Aamhi asu Laadke 2005

0
1470
Asech-He-Kase-Base
गाण्याचे शीर्षक:असेच हे कसेबसे
चित्रपट:आम्ही असू लाडके
गायक:सुरेश वाडकर
संगीत दिग्दर्शक:अशोक पत्की
गीत:सुरेश भट

असेच हे कसेबसे हे गीत आम्ही असू लाडके या चित्रपट मधले असून या गीत चे गायक सुरेश वाडकर हे आहेत. ह्या गीत ला संगीत अशोक पत्की यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द सुरेश भट यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

असेच हे कसेबसे, कसेतरी जगायचे
कुठेतरी कधीतरी, असायचे.. नसायचे
असाच हा गिळायचा, गळ्यामधील हुंदका
कसेबसे तगायचे, धरून धीर पोरका

असाच हा श्वास तोकडा, पुन्हा पुन्हा धरायचा
असाच जन्म फाटका, पुन्हा पुन्हा शिवायचा
असेच पेटपेटुनी, पुन्हापुन्हा विझायचे
हव्याहव्या क्षणासही, नको नको म्हणायचे

असेच निर्मनुष्य मी, जिथेतिथे असायचे
मनात सूर्य वेचुनी, जनात मावळायचे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here