अप्सरा आली – Apsara Aali Song Lyrics in Marathi – नटरंग 2009

0
2999
apsara-aali
गाण्याचे शीर्षक:अप्सरा आली
चित्रपट:नटरंग
गायक:बेला शेंडे
संगीत दिग्दर्शक:अजय-अतुल
गीत:गुरु ठाकूर
संगीत लेबल:झी म्युझिक मराठी

अप्सरा आली हे गीत नटरंग या चित्रपट मधले असून या गीत चे गायक बेला शेंडे हे आहेत. ह्या गीत ला संगीत अजय-अतुल यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत. आणि झी म्युझिक मराठी यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

कोमल काया कि मोहमाया पुनवचांदनं न्हाली
सोन्यात सजले रूप्यात भिजले रत्‍नप्रभा तनू ल्याली
ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बिजली पाहून थिजली इंद्रसभा भवताली

अप्सरा आली इंद्रपुरीतुन खाली
पसरली लाली रत्‍नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली चांदनी रंगमहाली
अप्सरा आली पुनवचांदनं न्हाली

छबिदार सुरत देखणी जणु हिरकणी नार गुलजार
सांगते उमर कंचुकी बापुडी मुकी सोसते भार
शेलटी खुणावे कटि तशी हनुवटी, नयन तलवार
ही रति मदभरली दाजी ठिनगी शिनगाराची
कस्तुरी दरवळली दाजी झुळुक ही वार्‍याची
ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बिजली पाहुन थिजली इंद्रसभा भवताली

अप्सरा आली इंद्रपुरीतुन खाली
पसरली लाली रत्‍नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली चांदनी रंगमहाली
अप्सरा आली पुनवचांदनं न्हाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here